मित्राशी लग्न करायला` त्याने लिंग ´बदललं अन आता संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं

मित्राशी लग्न करायला` त्याने लिंग ´बदललं अन आता संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं

Pandharpur Live Online :

चंडीगड - पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. ज्याठिकाणी लग्नाच आमिष दाखवून एका युवकानं त्याचाच मित्र रवीला मुलगी बनवलं आणि त्यानंतर लग्न करून त्याला कुटुंबापासून दुरावलं.

मात्र काही दिवसांनी अर्जुननं त्याला सोडून किन्नरांच्या हाती सोपवलं आहे. सध्या हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलीस रवी जो आता रिया बनली आहे. तिला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

३ वर्षापूर्वी रवी त्याचे आयुष्य सुखाने जगत होता. एका कंपनीत तो मित्र अर्जुनसोबत काम करत होता. हळूहळू अर्जुन आणि रवी दोघंही एकमेकांच्या इतके जवळ आले की, त्यांच्यात काहीच अंतर राहिलं नाही. अर्जुनने रवीला लग्नाची मागणी घातली. परंतु त्यासाठी अर्जुननं रवीसमोर एक अट घातली. ही अट म्हणजे रवीला मुलगा न राहता मुलगी बनावं लागेल त्यानंतर ते दोघं एकमेकांशी लग्न करतील. प्रेमात आंधळा झालेल्या रवीने अर्जुनची ही अट मान्य केली. आणि रवीचा रिया बनण्यास तयार झाला.

रवी उर्फ रियाचं म्हणणं आहे की, काही वर्षापूर्वी माझं नाव रवी होते. परंतु लिंग बदल करून त्याने रिया नाव ठेवले. अर्जुन आणि मी एकत्र काम करत होतो. लग्नासाठी अर्जुनने सुरुवातीला लिंग बदल करण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी रिया बनले आणि त्याच्याशी लग्न केले. कुटुंबानेही मला स्वीकारलं. परंतु काही दिवसांनी अर्जुनने मला सोडून दिले. आता तो मला तृतीयपंथीयांकडे सोपवत आहे. परंतु मला त्याच्यासोबत राहायचं आहे. कारण त्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहचले आहे. अर्जुननं आपल्यासोबत फसवणूक केली असा आरोप रवी उर्फ रियानं पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जसबीर सिंह म्हणाले की, आमच्याकडे या प्रकाराची तक्रार आली आहे. रवीने अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी त्याचे जेंडर चेंज केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.