पंढरपूर सिंहगड च्या यशात मानाचा तुरा! पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील "शैक्षणिक सेवा गौरव" पुरस्कार जाहीर

Pandharpur Live :- अनेक वर्षापासून अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन नॅशनल रूल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव यांच्याकडून अंतरराज्य पुरस्कार पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार ३१ मे २०२१ रोजी बेळगाव येथील अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न होणार असुन या पुरस्कारासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, राजकीय नेते, मठाधिश उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर सिंहगड च्या यशात मानाचा तुरा! पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील "शैक्षणिक सेवा गौरव" पुरस्कार जाहीर
पंढरपूर: प्रतिनिधी :
नॅशनल रूल डेव्हलपमेंट फाऊंडेशन कर्नाटक राज्यातील बेळगाव यांच्या कडून देण्यात येणारा शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती अंतरराज्य पुरस्कार वितरण समितीकडून देण्यात आली आहे.

      कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा बेळगाव यांच्याकडून अंतरराज्य पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार महाराष्ट्रातील पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार ३१ मे २०२१ रोजी बेळगाव येथील अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न होणार असुन या पुरस्कारासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, राजकीय नेते, मठाधिश उपस्थित राहणार आहेत.

    शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असुन पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनी, शासकीय क्षेत्रात तसेच नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे तरूण उद्योजक तयार करण्यात करांडे सरांचा सिंहाचा वाटा आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून डाॅ. कैलाश करांडे यांचा संपुर्ण महाराष्ट्रात परिचय आहे.

    अनेक वर्षापासून अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन नॅशनल रूल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव यांच्याकडून अंतरराज्य पुरस्कार पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना जाहीर झाल्याने सिंहगड परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन डॉ. कैलाश करांडे यांचे संपुर्ण सोलापुर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे.

.............................................................

Advertised on Pandharpur Live

....................................