वऱ्हाड झोपेत असताना दरीत कोसळली बस ; 7 जणांचा मृत्यू,45 जखमी

वऱ्हाड झोपेत असताना दरीत कोसळली बस ; 7 जणांचा मृत्यू,45 जखमी

Pandharpur Live Online :

आंध्र प्रदेश : चित्तूर येथे काल रात्री झालेल्या बस अपघातात 7 जण ठार तर 45 जखमी झाले आहेत. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बक्रपेटा भागात चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस कठड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला.

जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहेत.

अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून ही खाजगी बस 52 लोकांच्या लग्नाचं वऱ्हाड घेऊन चित्तूरमधील नागरीजवळील एका गावाकडे निघाली होती. बस घाटातून जात असताना अडुपुटप्पी दरीत कोसळली. पोलीस, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केलं. मात्र, दरी 50 फूट खोल असल्याने अंधारामुळे कारवाईत अडथळे येत होते. सकाळपर्यंत बचावकार्य सुरु होतं.