20 वर्षाच्या लहान तरुणीसोबत थाटला संसार,लग्नानंतर 5 महिन्यांनी45 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य

20 वर्षाच्या लहान तरुणीसोबत थाटला  संसार,लग्नानंतर 5 महिन्यांनी45 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य

Pandharpur Live Online :

बंगळुरू : वयात बरंच अंतर असलेल्या कपलनी लग्न केल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. काही लोक प्रेमात आंधळे होऊन तर काही लोक इतर काही कारणामुळे आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीशी लग्न करतात.

कर्नाटकातील असंच एक कपल काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलं आहे. आता त्यांच्याबाबतच धक्कादायक बातमी समोर येते आहे. 20 वर्षांनी लहान तरुणीशी लग्न करणाऱ्या 45 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातील अक्कीमारी गावातील 45 वर्षांचा शंकराप्पाने  25 वर्षांच्या मोहनासोबत लग्न केलं.

5 महिन्यांपूर्वी म्हणजे 19 ऑक्टोबर 2019 ला दोघांनी लग्न केलं. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते खूप प्रसिद्ध झाले. लग्नानंतरही हे कपल आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत होतं.

पण आता लग्नाच्या 5 महिन्यांनंतर शंकराप्पाच्या निधनाची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  'सिगारेट-दारू सोडा नाहीतर घराबाहेर पडा', बायकोने धमकी देताच नवऱ्याने घेतला शॉकिंग निर्णय घरामागील गार्डनमध्ये शंकरप्पा मृतावस्थेत आढळला. हुलिआरू दुर्गा पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्याची पत्नी आणि आईचं भांडण असल्याचं सांगितलं जातं आहे.

शंकराप्पाची पत्नी मोहाना म्हणाली, माझा पती आणि मी आनंदात होतो. पण माझी सासू दर 15 दिवसांनी माझ्याशी भांडायची. मी बाहेर जात असल्याचा आरोप तो माझ्यावर करायची. माझ्या आईवडीलांशीही बोलायची नाही.

माझ्या नवऱ्याने अशा परिस्थिती कुटुंबाला पाठिंबा देऊन शकत नाही असं म्हटलं. माझी सासू त्याला मर असं म्हणत ओरडली. त्यामुळे एक दिवस तो घरातून गेला तो परत आलाच नाही आणि सकाळी हे असं दिसलं. मी चार महिन्यांची प्रेग्नंट आहे.

काय म्हणावं यांना! एकाच वर्षात 3 मुलांचे आईबाबा झाले; आता चौथ्या बाळाच्या स्वागताची तयारी शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्वान पाळण्यावरून सासू-सुनेत वाद होता. शंकरप्पाने आईची बाजू घेतल्याने मोहानाने त्याच्याशी वाद घेतला. यामुळे त्याने आत्महत्या केली असं त्यांचं म्हणणं आहे.