सिंहगड पब्लिक स्कूलच्या शिवम गोगावची जिल्हा क्रिकेट संघात निवड

सिंहगड पब्लिक स्कूलच्या शिवम गोगावची जिल्हा क्रिकेट संघात निवड
...................
Pandharpur Live Video News Updates
पंढरपूर: प्रतिनिधी

सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपुर) येथील इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमार शिवम शाम गोगाव या विद्यार्थ्यांची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर येथे १६ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जवळपास संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातून ३०० हून अधिक मुले सहभागी झालेली होती. यापैकी ३० मुलांची निवड सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात करण्यात आली आहे. या ३० विद्यार्थ्यामध्ये पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी शिवम शाम गोगाव याचा समावेश झाला आहे.

त्याच्या या निवडीबद्दल पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.कैलाश करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर यांच्यासह स्कूलमधील सर्व शिक्षक तसेच शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • .......

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive