राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख

Pandharpur Live : हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचं नांव घेताच सार्‍या मराठी बंधुभगिनींचा ऊर अभिनामानं भरून येतो. शिवराय अखेरपर्यंत शत्रूंशी लढत राहिले आणि कोणत्याच दुसर्‍या राजाचं मांडलिकत्व त्यांनी पत्करलं नाही. यात शिवरायांचा पराक्रम तर आहेच, परंतु त्यांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा देणार्‍या, त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस सतत जागृत ठेवणार्‍या आणि सतत खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंचाही मराठी स्वराज्य संस्थापनेत मोठा वाटा होता. 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई आणि वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. पुढे डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांपैकी थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला. तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मातेच्या छत्रछायेखाली मोठे झाले. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या.

आजच्या दिवशी पाहूयात जिजाऊंच्या जीवनातील काही क्षणचित्रे..

पाचाड येथील राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि त्यांची बैठक

शिवरायांचे प्रेरणास्थान

कडक शिस्तीच्या पण तितक्याच प्रेमळ जिजाऊ-संकल्पचित्र

...............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

सिंदखेड राजा गावची लेक, लखुजीराजेंची लाडकी जिजाऊ

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी

छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम

अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त

विनम्र अभिवादन!

केवळ शिवाजी महाराजांचीच नाही तर सईबाई यांच्या अकाली निधनानंतर संभाजीराजांची जबाबदारीही त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळली. आदर्श माता, राज्यकर्त्या म्हणून जिजाबाईंकडे पाहिले जाते. त्यांचे गुण, धैर्य याचे वर्णन अनेक कथा, कांदबऱ्या, मालिका, सिनेमांतून करण्यात आले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊंना विनम्र अभिवादन