यामी गौतमला ऐनवेळी लग्नात नेसावी लागली होती आईची जुनी साडी केला शॉकिंग खुलासा

Pandharpur Live Online :
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा 'दसवी' हा सिनेमा कालपरवाच रिलीज झाला. या चित्रपटानंतर एका मुलाखतीत यामीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.
यामी म्हणाली, 'माझं लग्न ज्या पद्धतीने झालं, त्यावरून माझं व्यक्तिमत्त्व कळतं. मी नशीबवान आहे की, मला माझ्यासारखा विचार करणारा जोडीदार मिळाला. लग्नाचा दिवस तुमचा खास दिवस असतो. यादिवशी हे कर, ते कर, असं कुणी सांगत असेल तर ते कुणाालाच आवडत नाही. लग्नात मी मोठ्या डिझाईनर्सचे कपडे घालू शकले असते. पण मी जाणीवपूर्वक बड्या फॅशन डिझाईनर्सचे कपडे न घालण्याचा निर्णय घेतला. कारण फॅशन इंडस्ट्रीत काही असे लोक आहेत, जे तुम्हाला त्यांचे आऊटफिट देत नाहीत. ते तुम्हाला त्या लायकीचे समजत नाहीत. एका बड्या डिझाईनरने मला एकदा त्याने डिझाईन केलेला लहंगा देण्यास नकार दिला होता. तो तुझ्यासाठी नाही, असं तो मला म्हणाला होता. यानंतर मी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. हे खरंच वाईट आहे. तुम्ही एखाद्यासोबत इतकं वाईट कसं वागू शकता? अर्थात अनेक चांगली माणसंही आहेत, जे तुम्हाला चांगली वागणूक देतात. '
यामीच्या लग्नाचा फोटो समोर आला आणि सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला होता. कारण यामी व आदित्य लग्न करणार, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोघांनीही लग्नचं काय तर रिलेशनशिपही जगापासून लपवून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती.