शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने "शिवस्वराज्य पंढरीरत्न" पुरस्कार जाहीर! १३ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार विविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव

PANDHARPUR LIVE: शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार दिनांक १३जून रोजी सकाळी ठिक १० वाजता येथील राजामाता जिजाऊ उद्यान, पंढरपूर येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असुन यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने "शिवस्वराज्य पंढरीरत्न" पुरस्कार जाहीर!  १३ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार विविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव

शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार दिनांक १३जून रोजी सकाळी ठिक १० वाजता येथील राजामाता जिजाऊ उद्यान, पंढरपूर येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असुन यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे हे असतील तर प्रमुख पाहुणे चेअरमन भगिरथ (दादा) भालके, पंढरपूर नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले ,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम हे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी सौ.शैलाताई गोडसे,गादेगाव ग्रामपंचायत सदस्या सिमाताई बागल, नगरसेवक महादेव धोत्रे, समाजसेवक संजय ननवरे, नगरसेवक किरणराज घाडगे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे, देवराज युवा मंच अध्यक्ष शहाजी शिंदे,श्रीनिवास उपळकरआदी उपस्थित राहणार आहेत.

................................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................


शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने जाहीर झालेले "शिवस्वराज्य पंढरीरत्न" पुरस्कार व त्याचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.


1)उत्कृष्ट वारकरी संप्रदाय संत - सुधाकर (महाराज) इंगळे सोलापूर  

2)उत्कृष्ट पत्रकार - भगवान वानखेडे (संपादक पंढरपूर लाईव्ह)

3)समाजसेवक - महेश डोंगरे बिंटरगाव  

4)उत्कृष्ट सामाजिक संस्था- संतोष माने सांगली

5)उत्कृष्ट शिक्षिका -नंदिनी किसन टेळे मासाळ
(मंगळवेढा )

6)उत्कृष्ट सायकलिंग- सूर्यकांत पवार पुणे

7) वैद्यकिय समाजसेवा- डाॅ.सोमनाथ शिंदे पंढरपूर 

8) उत्कृष्ट विधीज्ञ- ॲड. दत्तात्रय पाटील कौठळी

9) उत्कृष्ट युवा उद्योजक- सोमनाथ शिंदे गादेगाव

10)उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी- इकबाल रशीद शेख सोलापूर

11)उत्कृष्ट कलाकार- ओम जोजारे पंढरपूर

12)उत्कृष्ट क्रिकेट समालोचक- नितीन वाघमारे पंढरपूर

यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शहराध्यक्ष किरण शिंदे व सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे.