वाचवा साहेब! बायको काठीनं हाणते, जिल्हाधिकारी कार्यालयात नवरा धाय मोकलून रडला

वाचवा साहेब! बायको काठीनं हाणते, जिल्हाधिकारी कार्यालयात नवरा धाय मोकलून रडला

Pandharpur Live Online :

पन्ना: मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी दरम्यान लोक आपल्या तक्रारी घेऊन येतात. जिल्हाधिकारी कार्यालयात एक व्यक्ती आपली गाऱ्हाणं घेऊन पोहोचली.

पत्नीवर वैतागलेल्या पतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला. पत्नी शिवीगाळ करत काठीनं मारहाण करत असल्याची व्यथा त्यानं मांडली. त्यानं घटनेचा व्हिडीओदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला. पन्ना शहरातील इंद्रपुरी वसाहतीत हा घटना घडला.

राम रतन सिंगरौलचं लग्न १३ वर्षांपूर्वी मिनूशी झालं. त्यांना एक ११ वर्षांची मुलगी आहे. पत्नीमुळे त्रासलो असून जेव्हा जेव्हा घरी जातो, तेव्हा पत्नी काठीनं मारते, अशी व्यथा राम रतननं मांडली. माझी पत्नी मला जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहे. ती मला मानसिक त्रास देते. मी घरात नसताना काही लोकांची माझ्या घरी ये-जा असते, असंही राम रतन म्हणाला.