संत तुकाराम महाराज बिजोत्सव ; तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमली प्रति `देहू ´नगरी

संत तुकाराम महाराज बिजोत्सव ; तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमली प्रति `देहू ´नगरी

Pandharpur Live Online :

बीडमधील केज तालुक्यातील प्रतिदेहू श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे संत तुकाराम महाराम बिजोत्सवाचा सोहळा पार पडला.

सोहळ्यानिमित्त संत तुकोबाराय पावनधामचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले.

सोहळ्यासाठी माजी राज्यमंत्री अशोक पाटील,भाजप नेते नंदकिशोर मुंदडा, अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महादेव महाराज म्हणाले, जगाच्या उध्दारासाठी तुकोबाराय आले आणि समाजामध्ये शांती निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारच्या भेदाच्या भिंती ढासळून एक्याचा सिद्धांत प्रस्तापित केला.

आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाच्या देशातील माणसे आहोत याचे भान ठेवून प्रत्येक तरूणाने व्यसनाच्या आहारी न जाता आदर्श जीवन जगावे,असे आवाहन महादेव महाराज यांनी केले आहे.

महादेव महाराजांच्याया कीर्तनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बीडमधील केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधामला प्रतिदेहू म्हणून ओळखले जाते.

तुकोबांच्या नाम गजराने श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम नगरी दुमदुमली होती.