आलिया आणि रणबीरच्या लग्नावर संजय दत्तची प्रतिक्रिया, म्हणाला....

Pandharpur Live Online :
अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
संजय दत्तनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'जर रणबीर लग्न करत असेल तर मी त्याला शुभेच्छा देतो. लग्न हे एकमेकांना करण्यात आलेलं वचन आहे. त्या दोघांनी एकमेकांची साथ द्यावी आणि खुश राहावं, तसेच रणबीर तु लवकर बाबा हो आणि आनंदी राहा.' रणबीरनं 'संजू' या संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या भूमिकेत रणबीरला पाहून प्रेक्षक थक्क झाले होते.
लवकरच संजय दत्तचा केजीएफ-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तो अधीरा ही भूमिका साकारत आहे. तसेच आलिया आणि रणबीर यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.