Corona Virus Updates: पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ; विभागात कोरोना बाधित 16 लाख 64 हजार 39 रुग्ण- विभागीय आयुक्त सौरभ राव

Pandharpur Live: पुणे विभागातील 15 लाख 90 हजार 110 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Corona Virus Updates:  पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ; विभागात कोरोना बाधित 16 लाख 64 हजार 39 रुग्ण- विभागीय आयुक्त सौरभ राव

        पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 15 लाख 90 हजार 110 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 64 हजार 39 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 387 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 40 हजार 114 रुग्णांपैकी 10 लाख 12 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 678 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.39 टक्के आहे.


*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 17 रुग्णांपैकी 1 लाख 73 हजार 97 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 496 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 290 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 546 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 418 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


*सांगली जिल्हा*
सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 36 हजार 158 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 661 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 609 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 41 हजार 460 रुग्णांपैकी 1 लाख 26 हजार 861 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................


*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 908 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 132, सातारा जिल्ह्यात 747, सोलापूर जिल्ह्यात 330, सांगली जिल्ह्यात 633 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 66 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 754 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 259, सातारा जिल्हयामध्ये 736, सोलापूर जिल्हयामध्ये 347, सांगली जिल्हयामध्ये 949 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 463 रुग्णांचा समावेश आहे.


*विभागातील लसीकरणाचे प्रमाण*
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 32 लाख 21 हजार 11, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 22 हजार 616, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 61 हजार 358, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख  56 हजार 958 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 27 हजार 617 नागरिकांचा समावेश आहे.


*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 99 लाख 51 हजार 584 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 64 हजार 39 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
 
(टिप :- दि. 20 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
 
****