राखी सावंतसोबत करण जोहरचं वागणं बघून भडकले लोक म्हणाले...

राखी सावंतसोबत करण जोहरचं वागणं बघून भडकले लोक म्हणाले...

Pandharpur Live Online :

एस.एस. राजामौली यांच्या RRR ची सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईत पार पडली. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. त्यांच्यासोबतच राखी सावंतही या पार्टीला होती.

दिग्दर्शक एस.एस. राजामौली सोबतच स्टार्स राम चरण  आणि ज्यूनिअर एनटीआर तसेच आमिर खान, करण जोहरही या पार्टीला होते. या पार्टीमध्ये राखी सावंतने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. राखीने इथे अनेकांचं मनोरंजन केलं. पण लोकांनी टिका केली ती करण जोहरवर.

या इव्हेंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत राखी RRR मधील 'नाचो नाचो' गाण्यावर डान्स करताना दिसली तर काही व्हिडीओत ती स्टार्सना भेटताना दिससली. एक असाच व्हिडीओ राखी सावंतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

राखी सावंत या व्हिडीओत राम चरणसोबत आणि ज्यूनिअर एनटीआरसोबत पोज देताना दिसत आहे. दोन्ही स्टार्सनेही राखीसोबत व्हिडीओत पोज दिली. यात राखी राम चरणला डान्ससाठी विचारतानाही दिसत आहे. त्यावर राम चरण तिला 'धन्यवाद' म्हणतो. त्यानंतर ती ज्यूनिअर एनटीआरजवळ येते. तो सुद्धा तिच्यासोबत पोज देतो. राखी करण जोहरजवळ जाते आणि त्याला करण सर म्हणून हाक मारते. पण तो तिच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करतो. अशात राखी स्माइल करत गपचूप तिथे उभी राहते.

राखीसोबत करण जे काही वागला त्यावरून लोक आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. करण यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका यूजरने लिहिलं की, करण कसा वागला. दुसऱ्याने लिहिलं की, 'करण जोहरचा अॅटिट्यूड फार खराब आहे. एका यूजरने लिहिलं की, त्याने तिला इग्नोर केलं. नेपोटिज्मचं दुकान.

त्याआधी राखी सावंतसोबत आमिर खानही पोज देताना दिसत आहे. दरम्यान RRR ने वर्ल्ड वाइट १२ दिवसात ९३९.४१ कोटी रूपयांची कमाई केली आणि लवकरच ही कमाई १ हजार कोटींच्या घरात होईल. या यशासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत ही शानदार पार्टी झाली