थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु; ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा स्वेरीत उपलब्ध

थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु; ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा स्वेरीत उपलब्ध

Pandharpur live online: 'थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (पदवी) च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. ०३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी फार्मसीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६३९७) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

Pandharpur Shopping 

खरेदी करा भारतातील नंबर वन 'होंडा बाईक'

पंढरपूरमधील होंडा चे अधिकृत विक्रेते "संग्राम होंडा" के.बी.पी. कॉलेज रोड, मार्केट यार्ड समोर, पंढरपूर संपर्क:

फोन नंबर: (02186) 229333 मोबाईल: 9730819333

....................

*जगातील सर्वात जास्त विक्री व सर्वात कमी डिझेल लागणारे ट्रॅक्टर! एक्सकॉर्टस पॉवरट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे अधिकृत शोरूम ’शिंदे ट्रॅक्टर्स'*

 *चंद्रभागेच्या पैलतीरावर, अहिल्या पुलानजीक, पंढरपूर उत्कर्ष गॅलरीचे पुढचे पाऊल! संपर्क: - 9673999695

...................................

पंढरीतील सुप्रसिध्द अनिकेत मोबाईल शॉपी! खास दिवाळी धमाका..!!

‘अनिकेत मोबाईल शॉपी’, शहा पेट्रोल पंपासमोर, चप्पल लाईन, पंढरपूर. मोबाईल 9822818787  

.................

"नामदे मिस्त्री फर्निचर" ; आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर!

प्रोप्रायटर: परमेश्वर नामदे (मिस्त्री) संपर्क: दत्ता दहिवडकर कापड दुकान, पंढरपूर नगरपरिषदेसमोर, पंढरपूर. मोबाईल नंबर: 9960173510

 ............................  

     महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरी फार्मसी मध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया दि. ०३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झालेली आहे. थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी (पदवी) प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि.१४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालेल.

रजिस्ट्रेशन साठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-८०० रु. आणि इतर प्रवर्ग-६०० रु. असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. फार्मसी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. रामदास नाईकनवरे (८३९०९०६१४६) किंवा स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.