मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे कामास सुरूवात; युवा नेते अभिजीत (आबा) पाटील यांच्याकडून ५ लाख १ हजार रूपयांचा निधी

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे कामास सुरूवात; युवा नेते अभिजीत (आबा) पाटील यांच्याकडून ५ लाख १ हजार रूपयांचा निधी

Pandharpur Live Online :

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम छत्रपती बहुउद्देशीय संस्थेने सुरू केले आहे. पुतळ्याचे कामकाज सुरू असल्याने पंढरपूर-मंगळवेढ्याचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांनी ५ लाख १ हजार रूपयांचा निधी संबंधित बहुउद्देशीय संस्थेला देऊन खारीचा वाटा उचलला आहे.

मंगळवेढा हि संताची, ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य मंगळवेढा नगरीत होते. महाराजांचे आचार-विचार जनमानसात व येणाऱ्या पिढीसमोर रूजून ऊर्जेचा स्रोत सतत डोळ्यासमोर राहावे. शिवजन्मोत्सव समितीने सह्याची मोहीम राबवत त्यास मंगळवेढेकरांनी उत्सुद प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिजीत पाटील यांनी मनापासून आभार मानले.

यावेळी मंगळवेढा नगराध्यक्ष सोमनाथ माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक अजित जगताप, सभापती  प्रवीण खवतोडे,  राहूल सवंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  माऊली कौंडभैरी, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक  अभिजीत कदम, अशोक डोरले, संभाजी घुले, अनिल मुदकूल आदी उपस्थित होते.