तुंगत-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशाताईंचा "कोविड योद्धा" म्हणून सन्मान

तुंगत-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशाताईंचा "कोविड योद्धा" म्हणून सन्मान

प्रतिनिधी दिनेश नकाते :दि.25/12/21प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत येथे कोव्हीड-१९ सारख्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या घरी जाऊन रुग्णांची सेवा केली व त्यांना वेळेत औषध उपचार दिले आशा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत येथील आशा वर्कर यांना आपल्या कामाची पोचपावती म्हणून व शब्बासकी म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य समजून जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष प्रा. सुभाषराव माने सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशाताईंचा covid-19 योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र शाल, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

त्यावेळी पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, तुंगत ग्रामपंचायतीचे उपसरपंच लामकाने, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय सरवदे, ग्रामसेवक श्रीधर चेंडगे, डॉक्टर दत्ता माने, विस्ताराधिकारी जावळे साहेब, आरोग्य सहाय्यक अनिल यलमार, आशा सुपरवायझर बाजारे साहेब, महेश गोडसे, अरुण महाजन,

आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत नवत्रे, डॉक्टर रणजित रेपाळ, आरोग्य सहाय्यक फिरोज शेख, आरोग्य सहाय्यका जया लंगोटे, सरस्वती चौगुले, अरुणा पाटेकर, अश्विनी तारे, किरण इंगळे, डॉक्टर राजकुमार रणदिवे,डॉक्टर शिवराज घाडगे मगरवाडी, डॉक्टर सुरेखा कोंडभैरी, डॉक्टर अनुजा निंबाळकर, अमित रोकडे, क्लार्क क्षिरसागर, आरोग्य सेवक पी एल गायकवाड, आशा प्रवर्तक वर्षा पाटोळे, सुनिता चव्हाण, पुष्पा हाडमोडी, वैशाली कुंभार, सुवर्णा कुंभार, तानाजी रणदिवे वाहन चालक सिद्धेश्वर रणदिवे, अमित मुळे, संदीप राऊत व इतर मान्यवर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत येथील सर्व कर्मचारी व आशा ताई वर्कर्स ऑपरेटर ज्ञानेश्वर बनसोडे.