परळी तालुक्यातील विकासापासून कोसो दूर असलेल्या एका गावाची व्यथा: पोहनेर शिवारातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची चाके अडकली

परळी तालुक्यातील विकासापासून कोसो दूर असलेल्या एका गावाची व्यथा:  पोहनेर शिवारातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची चाके अडकली

  PANDHARPUR LIVE NEWS परळी तालुक्यातील पोहनेर हे गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. येथील पांदणरस्ते व शेतरस्ते व्यवस्थित नसल्यामुळे पोहनेर शिवारातील शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी च्या पावसाळ्यात तर पोहनेर ते खतगव्हाण पांदणरस्ता, तारुगव्हाण -पोहनेर बंधाऱ्याचे तसेच पाझर वड्याचे पाणी आल्यामुळे या पांदणरस्त्याला नदीचे स्वरुप आले होते.

 शेतकऱ्यांच्या अधोगतीची नस ही पांदणरस्त्यामुळे होत आहे. या पांदणरस्त्या मुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राची गती पुर्णपणे मंदावली आहे. पांदणरस्ते नादुस्तीकडे पुढारशाहीचा कानाडोळा आहे.पांदणरस्ते नादुरुस्त असल्यामुळे पोहनेर शिवारातील शेतकर्‍यांना ऊसाची शेती हे एक दिवास्वप्न ठरत आहे.

 शेतकऱ्यांना परवडणारे पिक म्हणुन ऊस शेती कडे बघीतले जाते. पोहनेर शिवारातील शेतकर्‍यांना सुजलाम सफलाम करण्याची क्षमता ही तारुगव्हाण -पोहनेर बंधाऱ्यात आहे. या प्रकल्पामुळे पोहनेर शिवारात हरीतक्रांती होण्यासाठी पांदणरस्ते व शेतरस्ते अडसर ठरत दणरस्त्यांसाठी पोहनेर ग्रामपंचायत ठोस भूमिका घेईल का? यातुन होणाऱ्या पोहनेर येथील शेतकऱ्यांना पांदण रस्त्याच्या ञासा पासून मुक्त करणार का?

 मुख्यत्वे: 1)पोहनेर -खतगव्हाण 2) पोहनेर -कोथाळा 3 )पोहनेर -तेलसमुख व इतर पांदणरस्ते शिवारातील प्रगतीच्या मार्गात अडसर ठरत आहेत.

या अडसरासाठी कोण खत पाणी घालत आहे का? पोहनेर गावातील पुढारी शेतकऱ्यांना केवळ गोडबोलण्याची भुमिका घेतात त्यांचे लक्ष केवळ भरीव उत्पन्न मिळणाऱ्या साधनातच असते. याच बाबीवर ते पुर्णपणे लक्ष केंद्रित करत नसतील ना. त्यांनी आपली भूमिका पांदणरस्ते रस्त्याकडे व शेतरस्त्याकडे वळवावे अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. पोहनेर येथे पालकमंत्री व जिल्ह्याच्या दबंग खासदार यांनी पोहनेर गणातील पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळेस पोहनेर शिवारातील शेतकर्‍यांनी पांदणरस्ते संदर्भात निवेदना मार्फत त्यांना मागणी केली.

 त्यांच्या मार्फत हा प्रश्न सुटतील अशी शेतकऱ्यांत अपेक्षा आहे. लवकरात लवकर हा पांदणरस्ते व शेतरस्ते हा प्रश्न सुटावा अशी शेतकर्‍यांत चर्चा होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, खळे,शेतातील माल घरी नेण्यासाठी पांदणरस्ते महत्वाचे आहेत. काही शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन खळे व रब्बी ची करण्यासाठी रस्ताची खुप मोठी गरज आहे. शेतातील आहे तो ऊस नेण्यासाठी देखील कसलाच रस्ता नाही. या शेतकऱ्यांना वरीष्ठ लोकप्रतिनिधी या मरण यातनेतुन सोडणार का? अशी चर्चा पोहनेर शिवारातील शेतकर्यात बोली जात आहे.

Pandharpur Shopping 

खरेदी करा भारतातील नंबर वन 'होंडा बाईक'

पंढरपूरमधील होंडा चे अधिकृत विक्रेते "संग्राम होंडा" के.बी.पी. कॉलेज रोड, मार्केट यार्ड समोर, पंढरपूर संपर्क:

फोन नंबर: (02186) 229333 मोबाईल: 9730819333

........................

पंढरीतील सुप्रसिध्द अनिकेत मोबाईल शॉपी! खास दिवाळी धमाका..!!

‘अनिकेत मोबाईल शॉपी’, शहा पेट्रोल पंपासमोर, चप्पल लाईन, पंढरपूर. मोबाईल 9822818787  

.................

"नामदे मिस्त्री फर्निचर" ; आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर!

प्रोप्रायटर: परमेश्वर नामदे (मिस्त्री) संपर्क: दत्ता दहिवडकर कापड दुकान, पंढरपूर नगरपरिषदेसमोर, पंढरपूर. मोबाईल नंबर: 9960173510

 ..........................