परळीत सोयाबिनला प्रती क्विंटल 6369रू.उचांकी भाव ! दिड हजार क्विंटल सोयाबिन बाजारात दाखल

परळीत सोयाबिनला प्रती क्विंटल 6369रू.उचांकी भाव ! दिड हजार क्विंटल सोयाबिन बाजारात दाखल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी कृषी बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास दिवंसे दिवस वाढत चालला असुन आज शेतकऱ्यांनी आपला सोयाबिन विक्रिस आणला असता लातुर जिल्ह्यापेक्षाही 175 रू.वाढवुन प्रति क्विंटल 6369रू असा उचांकी दर शेतकऱ्यांना मिळाला असुन शेजारच्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ व गंगाखेडयेथील शेतकऱ्यांना परळीत  चांगला दर मिळाळ्याने चेहऱ्यावर आनंदी भाव दिसुन आला.

परळी कृषी उत्पन  बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध धान्याला चांगला भाव मिळावा व त्यांचा विश्वास कायम पाठिशी रहावा हे ध्येय स्व.पंडित अण्णां मुंडे यांनी नेहमी जोपासले त्यांनी घालुन दिलेल्या आदर्शावर व  ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार व वाल्मिक अण्णा कराड यांनी केलेल्या सल्ले नुसार आम्ही शेतकऱ्यांचे हित नजरे समोर ठेवुन

शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणुनच आज परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यासह परभणी जिल्ह्यातील सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील शेतकरी बांधव विश्वास ठेवुन आपला माल विक्रिस आणत असुन मालाला परळीत चांगला भाव मिळाला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे व तो आनंद आम्ही याही पुढे तसुभरही कमी पडु देणार नाही असे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.गोविंद फड यांनी सांगीतले

असुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती प्रा.विजय मुंडे सर्व संचालक मंडळ, सचिव बी.आर. रामदासी व अकाऊटंन गोविंड मुंडे व सर्व कर्मचारी शेतकरी बांधवाच्या हितासाठी कार्य करणार अशी ग्वाही सभापती अँड.गोविंड फड यांनी दिली.