खुशखबर ! पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येणार 4000 रुपये

खुशखबर ! पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येणार 4000 रुपये

Pandharpur Shopping 

संग्राम होंडाकडून सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! खरेदी करा भारतातील नंबर वन 'होंडा बाईक'

पंढरपूरमधील होंडा चे अधिकृत विक्रेते "संग्राम होंडा" के.बी.पी. कॉलेज रोड, मार्केट यार्ड समोर, पंढरपूर संपर्क:

फोन नंबर: (02186) 229333 मोबाईल: 9730819333

....................

*जगातील सर्वात जास्त विक्री व सर्वात कमी डिझेल लागणारे ट्रॅक्टर! एक्सकॉर्टस पॉवरट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे अधिकृत शोरूम ’शिंदे ट्रॅक्टर्स'*

 *चंद्रभागेच्या पैलतीरावर, अहिल्या पुलानजीक, पंढरपूर उत्कर्ष गॅलरीचे पुढचे पाऊल! संपर्क: - 9673999695

...................................

Pandharpur Live Online:

पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi) केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.जी लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार (Modi Government) शेतकर्‍यांना मिळणारी ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात.

सरकारने PM Kisan Samman Nidhi योजनेच्या जुन्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. आता पीएम किसान सम्मान स्कीमचा लाभ त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांच्या नावावर शेती असेल. म्हणजे वारसागत जमीनीत नाव असलेल्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नावावर शेती नसेल तर ताबडतोब करून घ्या अन्यथा पुढील हप्ता अटकू शकतो.

-

द्यावी लागेल ही माहिती
2019 मध्ये सुरू झालेल्या PM Kisan Samman Nidhi योजनेत मागील काही काळापासून काही गडबड होत असल्याचे आढळून आले आहे, त्या सुधारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शेतकरी सम्मान निधी योजनेत नवीन रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांना आता अर्जात आपल्या जमीनीचा प्लॉट नंबर सुद्धा सांगावा लागेल. मात्र, नवीन नियमाचा प्रभाव जुन्या लाभार्थ्यांवर पडणार नाही.

कोणत्या शेतकर्‍यांना मिळतो फायदा

- असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत,

- वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत,आमदार, खासदार आहेत.

- केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.

- व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही.

- इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.

- केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्‍यांना लाभ मिळेल.

या महिन्यांत येतो पीएम किसानचा हप्ता

पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता थेट 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

या चुकांमुळे अडकतात पैसे
- बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.

- IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.

- शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.

- गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.

Web Title :- PM Kisan Samman Nidhi | pm kisan beneficiaries card holders for rupees 4000 benefits submit this document