पंढरीतील DVP Multipex मध्ये साकारणार खा. अमोल कोल्हे अभिनीत ऐतिहासिक महानाट्य 'शिवपुत्र संभाजी महाराज' चा थरार! युवा नेते अभिजीतआबा पाटील यांचे दमदार नियोजन

पंढरीतील DVP Multipex मध्ये साकारणार खा. अमोल कोल्हे अभिनीत  ऐतिहासिक महानाट्य 'शिवपुत्र संभाजी महाराज' चा थरार!  युवा नेते अभिजीतआबा पाटील यांचे दमदार नियोजन

प्रतिनिधी/-
गेली दोन वर्ष कोरोना काळ सुरू असताना जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाःकार सुरू असल्यामुळे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य रद्द करण्यात आले होते. यंदा सर्वकाही सुरळीत झाल्यावर आपल्या पंढरपूरात छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त संभाजी महाराजांचे आदर्श जीवन आणि स्वराज्याचा धगधगता इतिहास उभे करणारे ऐतिहासिक महानाट्य 'शिवपुत्र संभाजी महाराज' अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराकडून आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते खा.अमोल कोल्हे साकारणार आहेत. निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र महाडिक आपल्या महाराजा शंभू छत्रपती, पुणे यांच्या प्रोडक्शन तर्फे सदर महानाट्य आपल्या समोर घेऊन येणार आहेत.

आज कामाची सुरूवात नारळ फोडून पूजन करण्यात आले. *दि ५ मे ते ९ मे २०२२* या काळात के.बी.पी कॉलेज रोड, DVP स्क्वेअर, चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे *दररोज संध्याकाळी ६ वाजता* हे महानाट्य संपन्न होणार आहे.

तरी विनामूल्य प्रवेश आहे.तरै पंढरपूर येथे ठिकठिकाणी विनामूल्य पासची सोय करण्यात आली आहे. 

शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला संघर्ष, त्यांचा पराक्रम शौर्य, बुद्धीमत्ता, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी याची देही याची डोळा अमोल कोल्हेंच्या दमदार अभिनयाने अनुभवता येणार आहे. या सोनेरी इतिहासाचा झंझावात अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक, पंढरपूरातील मायबाप तमाम जनता, मित्र परिवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिजीत आबा पाटील व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.