धाराशिव संचलित वसाका चे स्थापत्य अभियंता कुबेर जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त चेअरमन अभिजीत पाटील यांचेकडून सन्मान

धाराशिव संचलित वसाका चे स्थापत्य अभियंता कुबेर जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त चेअरमन अभिजीत पाटील यांचेकडून सन्मान

धाराशिव संचलित वसाका चे स्थापत्य अभियंता श्री कुबेर जाधव हे अक्षय तृतीयेच्या दिवशी कारखान्याच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. याबद्दल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कुबेर जाधव यांनी सहकारी साखर कारखान्यात अत्यंत  जबाबदारीने व कुशलतेने कामकाज करत असताना कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून, कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.

कारखान्याच्या सेवेत असताना कामगारांच्या विविध मागण्या, कारखाना  व्यवस्थापन व शासन स्तरावर मांडुन, वेळ प्रसंगी त्या, त्या काळातील व्यवस्थापणासी संघर्षाची भूमिका घेत वेळ प्रसंगी पंगाही घेण्यास मागे पुढे पाहीलेले नाही

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा साखर कारखानदांशी संघर्ष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतआले आहेत,आज दि.६ मे रोजी पंढरपूर येथील धाराशिव संचलित कारखान्यांच्या केंद्रीय कार्यालयात बोलावून  इंजिनिअर श्री कुबेर जाधव यांचा सेवा निवृत्तीच्या निमित्ताने चेअरमन अभिजीत पाटील यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे संचालक श्री आबासाहेब खारे, श्री संजय खरात , जनरल मॅनेजर पठाण , युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, उपाध्यक्ष वसंत पगार , सुरेश कोर,भुषन पगार, गायकवाड ,नवल भगत प्रभाकर सोनवणे, जावळी कर मोरे, बागुल आदी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.