पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात "क्वीझ काॅम्प्युटिशन" २ के २२ मोठ्या उत्साहात संपन्न

पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात "क्वीझ काॅम्प्युटिशन" २ के २२ मोठ्या उत्साहात संपन्न

*पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात "क्वीझ काॅम्प्युटिशन" २ के २२ मोठ्या उत्साहात संपन्न*

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील विद्युत अभियांत्रिकी विभाग ऑनलाईन क्वीझ काॅम्प्युटिशन २ के २२ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
 ही स्पर्धा इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक निकिता बागल, द्वितीय क्रमांक काजल पाटील यांनी पटकाविले असुन सर्व विजयी व उपविजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. आर. एम. पाटील यांनी अभिनंदन केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.