खर्डीत बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण 

खर्डीत बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण 

खर्डीत बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण 

खर्डी अमोल कुलकर्णी
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील पशु वैद्यकीय परिसर आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे वृक्ष लागवड करण्यात आली. गावातील जागृत युवा परिवार यांच्या वतीने फुलांचे रोपे आणि काही वनौषधी रोपट्यांची लागवड करण्यात आली.


दवाखान्यात येणाऱ्या रुग्णास मानसिक आनंद व आरोग्य दायी वातावरण निर्मिती साठी या फुलझाडांची निगा राखून स्वछता ठेवावी असे गणेश चंदनशिवे यांनी मनोगतात सांगितले.यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी श्री लोखंडे,प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता बागल,आरोग्य निरीक्षक शिवाजी कांबळे, आरोग्य सेविका राजमाता कोडे, औषध निर्माता लक्ष्मण साबळे, गटप्रवर्तक सुनीता शिंदे, आशा स्वयंसेविका हसीना तांबोळी, तर जागृत युवाचे अध्यक्ष 
 अपराजित रोंगे,किशोर पाटील,बजरंग रोंगे,रणजित ताड,गणपत रोंगे,भाऊ नकाते
आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.