स्वेरीज पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रम ‘टॅलेंट- हंट २०२२’ संपन्न 

स्वेरीज पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रम ‘टॅलेंट- हंट २०२२’ संपन्न 


     
टॅलेंट- हंटच्या माध्यमातून विद्यार्थ्याना मिळते उत्तम व्यासपीठ                                                                                                           -एन.जी.कुलकर्णी

स्वेरीज पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रम ‘टॅलेंट- हंट २०२२’ संपन्न 

पंढरपूर - ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यामध्ये दडलेले कलागुण आणि कौशल्ये बाहेर काढण्यासाठी टॅलेंट- हंट हे एक उत्तम व्यासपीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थी विविध स्पर्धात्मक उपक्रमांची सुरवात व तयारी करू शकतो.’ असे प्रतिपादन पंढरपुरातील द.ह.कवठेकर हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे अध्यापक एन.जी.कुलकर्णी यांनी केले.
       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये  ‘टॅलेंट- हंट २०२२’ हा राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी एन.जी.कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ.एन. डी.मिसाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावनेत ‘टॅलेंट- हंट २०२२’ या तांत्रिक स्पर्धेबाबत स्वरूप, बक्षिसे, स्पर्धेसाठी असणारा अवधी आदी सविस्तर माहिती दिली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, ‘प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतो पण स्पर्धेच्या युगात गुणवत्तेला खूप महत्व आहे. त्यासाठी अशा संशोधनात्मक व्यासपीठाची निर्मिती गरज आहे.

स्पर्धेत आपल्याला बक्षीस ‘मिळो’ अथवा ‘न मिळो’ हा भाग गौण आहे, परंतु स्पर्धेत सहभाग घेवून आपली कौशल्ये दाखवणे महत्वाचे आहे. या टॅलेंट- हंट स्पर्धेमध्ये पेपर प्रेझेंटेशन, ब्लाईंड-सी, रोबो रेसिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, क्वीझ कॉम्पिटीशन, जावा प्रोग्रामींग व प्रोजेक्ट एक्झीबीशन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माण पंचायत समितीचे सभापती अतुल जाधव हे उपस्थित होते. प्रत्येक उपक्रमातील विजेत्या विद्यार्थांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे, सन्मान चिन्हे व सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्ती पत्रके देण्यात आली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली व स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ.एन. डी.मिसाळ, टॅलेंट-हंट २०२२ चे समन्वयक प्रा. अजिंक्य देशमुख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विविध महाविद्यालयांतील स्पर्धक, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरदा खिस्ते व ज्ञानेश्वरी यादव यांनी केले तर समन्वयक प्रा.अजिंक्य देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.