विलासराव असते तर , आघाडीला शिवसेनेची गरजच पडली नसती : धीरज देशमुख

विलासराव असते तर , आघाडीला शिवसेनेची गरजच पडली नसती : धीरज देशमुख

PANDHARPUR LIVE ONLINE 

राज्यातील तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) टीकणार नाही असा अनेकदा विरोधकांकडून सांगितले जाते, भाजप (BJP) चे नेत हे सरकार पडेल याबद्दल वक्तव्य करत असतात. यादम्यान कॉंग्रेसचे नेते धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना महाविकास आघाडीबाबत एक मोठं विधान केलं.

अमित देशमुख यांना, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असते तर महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती का? असा प्रश्न भाजपचे आमदार परिणय फुके यांनी विचारला होता. त्यावर बोलताना धीरज देशमुख यांनी हे विधान केलं, ते सरकारनामा ओपन माइक या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.

विलासरावांकडून कोणता गुण घेतला?

या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांच्यातील असा कोणता गुण आहे, की तो तुम्ही आत्मसात करू शकत नाहीत आणि दुसरा असा कोणता गुण आहे, जो राजकारणात येताना तुम्ही पहिल्यापासूनच त्याच्याकडून आत्मसात केला, असा प्रश्न राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धीरज देशमुखांना विचारला. विलासराव यांचा हे शांत आणि संयमी होते, त्यांना राग येत नव्हता. आजचं राजकारण बघता ते आजच्या पिढीला सहज जमेल असं वाटत नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखा गुण म्हणजे, श्रद्धा आणि सबुरी. राजकारणात काम करत असताना डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवून काम करावे लागते ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली, असं धीरज देशमुख यांनी सांगतील.

राजकारणात तुमच्या परीवाराला मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे विलासराव यांच्यानंतर मोठी जबाबदारी अमित देशमुख यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर तुमचा भाऊ अभिनेता रितेश या दोघांमध्ये तुम्ही तिसरे आहात, मग अशा दोघांमध्ये आपण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केलेत असा प्रश्न शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी केला.

या प्रश्नवार बोलताना धीरज देशमुख म्हणाले की, राजकारणात येण्याचा माझा विचार लहानपणापासून डोक्यात नव्हता. आपल्या भागात व्यवसाय करण्याची इच्छा होती. राजकारणाची ओढ लोकांनी स्विकारल्यामुळ तयार झाली. लोकांनी प्रतिसाद दिला की तुम्ही करू शकता . तुमच्यामध्ये आम्ही ती क्षमता पाहतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तीच माझ्यातील क्षमता एकदा तपासून पाहावी म्हणून माझा हा राजकारणातील प्रवास सुरू झाला आणि आतापर्यंत चांगलं चाललं आहे, असं धीरज म्हणाले.

जेनिलिया (Genelia D'souza) चांगली अभिनेत्री की वहिनी..

तर पुढचा प्रश्न खासदार इम्तियाज जलील विचारला. त्यांनी धिरज देशमुख यांना राजकराण सोडून कुटुंबाशी निगडीत प्रश्न केला, त्यांनी एक एक्ट्रेस होती जेनिलिया डिसूजा, ती अभिनेत्री म्हणून चांगली होती की, भावाची बायको म्हणून चांगली आहे? असा प्रश्न करताच धीरज देशमुखांनी, वहिनी म्हणून ती सर्वात चांगली आहे, असं उत्तर दिलं.

कधी कधी असं वाटतं की..

आमदार परिणय फुके यांनी, विलासराव यांच्याबद्दल जे वाचलंय त्यावरून ते पुरोगामी होते. ते शिवसेना आणि भाजपविरोधात होते. मग आज विलासराव असते तर, महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती का? असा प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना धीरज देशमुख म्हणाले की, विलासराव असते तर, महाविकास आघाडी १०० टक्के अस्तित्वात आली असती. त्याबद्दल दुमत नाही, किंबहुना आम्हाला कधी-कधी असं वाटतं की, सत्ता ही आघाडीचीच आली असती असं ते म्हणाले. या उत्तरामुळे सत्तेत येण्यासाठी शिवसेनेची गरज पडली नसती, असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सूचवलं..