आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवकाची आत्महत्या

Health worker चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच एका आरोग्य सेवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.
Health worker प्राप्त माहितीनुसार, उमेश दिघाडे हे गेल्या 9 वर्षापासून मालखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत होते. ड्युटीवर असतांना त्यांनी रात्री 8 वाजताच्या उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलींग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे पीएसआय विलास धोंडे, पोलिस कर्मचारी प्रवीण मेश्राम, मनोज वानखडे, चालक जगदीश राठोड हे घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला होता. मृतकाच्या मागे पत्नी, 1 मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली असून एका आजाराने सदर मृतक त्रस्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिस करीत आहे.