*पंढरपूर सिंहगड मध्ये दहा ड्रम  कृषी तंञज्ञान कार्यशाळा संपन्न*

*पंढरपूर सिंहगड मध्ये दहा ड्रम  कृषी तंञज्ञान कार्यशाळा संपन्न*

*विष मुक्त शेती काळाची गरज*

○ *पंढरपूर सिंहगड मध्ये दहा ड्रम  कृषी तंञज्ञान कार्यशाळा संपन्न*

रासायनिक खताचा अतिरिक्त वापर झाल्याने शेतीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी मुबलक प्रमाणात रासायनिक खत वापरून शेती नापिक केली आहे. हे आता थांबणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विष मुक्त शेती करणे आवश्यक आहे. अनेकजण रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेतीकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी रेसिड्यु फ्री द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला उत्पादन घेणे आवश्यक आहे. अशा पालेभाजा व फळ पिकाला खुप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सुरक्षित शेती करणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक व नैसर्गिक समतोल टिकवायचा असेल तर विष मुक्त शेती करणे आवश्यक असल्याचे मत दहा ड्रम कृषी तंञज्ञान संशोधक शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.


  या कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, दहा ड्रम कृषी तंञज्ञान संशोधक शास्त्रज्ञ मंगेश भास्कर, प्रगतशील शेतकरी बापूसाहेब कोळवले, प्रसिद्ध उद्योजक सी. पी. बागल, पंढरपूर रोटरी क्लब अध्यक्ष किशोर निकते, सिता ई फाऊंडेशन चे अध्यक्ष नानासाहेब कदम, सिंहगड काॅलेज प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, कमलापुर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. अशोक नवले आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.


     या कार्यशाळेचे प्रास्ताविक नानासाहेब कदम यांनी केले. यादरम्यान उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांचे स्वागत रोटरी अध्यक्ष किशोर निकते यांनी केले.
     पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांचे, उत्पादनाचे मार्केटिंग होणे अपेक्षित आहे. सद्या द्राक्ष बागायतदार विषय खुप मोठा आहे. शेतकऱ्यांनी एकदम ऊस, डाळिंब, द्राक्ष पिके न घेता सर्व शेतकऱ्यांनी थोडी-थोडी लागवड केली तर पिकाला दर मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. एखादे पिक वारंवार न घेता, बदल पिक घेतले तर शेती नापिक बनणार नाही. याशिवाय शेतीला जोड व्यवसाय आवश्यक असल्याचे मत कल्याणराव काळे यांनी कार्यशाळेत बोलताना मत व्यक्त केले.
    हि कार्यशाळा "रेसिड्यु फ्री द्राक्ष, डाळिंब भाजीपाला उत्पादन या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे सुञसंचलन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार  नानासाहेबा कदम यांनी मानले.