श्री विठ्ठल फार्मसीच्या प्रा.अनिल लांडगे यांना पीएच.डी. प्राप्त

  श्री विठ्ठल फार्मसीच्या प्रा.अनिल लांडगे यांना पीएच.डी. प्राप्त


  
श्री विठ्ठल फार्मसीच्या प्रा.अनिल लांडगे यांना पीएच.डी. प्राप्त


पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इंन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.अनिल विजय लांडगे यांना नुकतीच तामिळनाडू मधील अण्णामलाई विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ‘फोर्मुलेशन अँड इव्याल्युएशन ऑफ इंट्रालेशनल मायक्रोइमलशन्स कंटेनींग कोलॅजिनेज अँड कौड्रायटीनेज फ्रॉम मायक्रोबियल सोर्स’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
         प्रा. डॉ. कृष्णमुर्ती कन्नन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे, बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या सहकार्याने प्रा.अनिल लांडगे यांनी फार्मसीमधील पीएच.डी. पूर्ण केली आहे. डॉ. लांडगे यांनी पीएच.डी. च्या संशोधनात वेगवेगळ्या पद्धतीच्या मायक्रोइमल्शनची निर्मिती करून त्यांची क्षमता तपासली होती. आत्तापर्यंत डॉ. लांडगे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण १० संशोधन पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख  डॉ.प्रशांत पवार व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. ‘डॉ. लांडगे हे स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयात गेल्या सात वर्षापासून उत्कृष्ठपणे ज्ञानदान करत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थ्यांनी डॉ. लांडगे यांचे अभिनंदन केले.