स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन साजरा

स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन साजरा


राजर्षी शाहू महाराजांनी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले.
                                                                                  -स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे
स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन साजरा


पंढरपूर- 'ब्रिटीश राजसत्तेचा अंमल असताना सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नती साठी आपले जीवन वेचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत शिक्षण, समाजकारण आणि राजकारण याचबरोबर शेतकरी व प्रजेच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे प्रशासकीय कार्यक्रमात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.’ असे प्रतिपादन गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले. 
       स्वेरीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिन प्रसंगी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.

करण पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, ट्रेनिंग कार्पोरेटचे प्रा. विक्रम चव्हाण, प्रसिद्धी विभाग अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ.व्ही.जी. काळे, प्रा. संदिपराज साळुंखे, प्रा. श्रीकृष्ण भोसले, इलेक्ट्रीकल सुपरवायझर संतोष जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त शंभर सेकंद एका जागी स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.