बापरे ! हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला ; दोघांचा मृत्यू

बापरे ! हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला ; दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था: छत्तीसगडमधील रायपूरमधील (Raipur) सिलतारा येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे हवा भरताना जेसीबीचा (JCB) टायर फुटला आहे. या अपघातात ( accident) उपस्थित असलेल्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

हा स्फोट (Explosion) इतका भीषण होता की, टायरजवळील दोन्ही कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासोबतच त्यांच्या शरीराचे काही तुकडेही आजूबाजूला विखुरले होते. त्याचवेळी जेसीबीचा टायर फुटल्याने ते दूरवर पडले. या प्रकरणाबाबत सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जान पाल यांनी सांगितले की, रामदिन सिंग (वय-३२) आणि राजभान नामदेव (वय- ३२), राहणार खमहरिया, ठाणे कोटोर, जिल्हा सतना हे घनकुन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये काम करत होते.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघेही जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायरचा मोठा आवाज झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.