पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बुधवार दिनांक ४ मे २०२२ रोजी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. राजेश पाटील, प्रा. विनोद मोरे, प्रा. अंजली चांदणे, पालक प्रतिनिधी महानंदा गायकवाड आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
   या मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे व पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले महानंदा गायकवाड यांचे स्वागत  पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.


      इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी विभागातील शैक्षणिक आढावा स्क्रीन द्वारे उपस्थित पालकांसमोर सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निकाल, प्लेसमेंटची माहिती, समुह चर्चा आदीसह अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती पालकांना दिली.


    दरम्यान काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी जे महाविद्यालयात शिकविले जाते तेवढेच जरे व्यवस्थित अभ्यास केला तर यश निश्चित भेटते. विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्यासाठी चिकाटी व जिद्द असणे आवश्यक आहे. विभागातील अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडले असल्याचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
   या मेळाव्यात शैक्षणिक वर्षांत व नामांकित कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र, गुलाब व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कौसर मुजावर व ऋतुजा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अजंली चांदणे यांनी मानले.