Police News : ' पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द ! ' पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील सर्व पोलिसांसाठी महत्त्वाची बातमी (Police News) आहे.
राज ठाकरेंच्या भाषणावर काय म्हणाले?
कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांत रजनीश सेठ यांनी कडक इशारा दिला आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तब्बल 15 हजार लोकांवर कारवाई केली असून 149ची नोटीस १३ हजार लोकांना देण्यातील आली, अशी माहिती त्यांनी दिला.
कारवाई आजच!
दरम्यान, याचवेळी पुढे बोलताना त्यांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याचं म्हटलंय. पोलिसांच्या सात तुकड्या तैनात असून कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल, असं रजनीश सेठ यांनी म्हटलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज ठाकरेंना नोटीस पाठवली की नाही, याबाबत माहीत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. हा विषय पोलीस आयुक्तांकडे असल्यांचं त्यांनी म्हटलंय. मात्र आजच (3 मे) यावर कारवाई होईल आणि औरंगाबादेत पोलीस आयुक्त यावर निर्णय घेतली असंही ते म्हणालेत.
कोण आहे पोलीस महासंचालक रजनीश सेठ?
- रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
- 29 डिसेंम्बर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म
- 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती
- बी ए ऑनर्स (एल एल बी) शिक्षण
- आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त
- रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.
- गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही जबाबदारी संभाळलेली आहे.
- राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदीही नियुक्ती
- शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख