इंदापूरातील नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

इंदापूरातील नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

इंदापूर : बाभुळगाव (ता.इंदापूर)गावचे हद्दीतील भिमा नदी पात्रातील पाण्यात पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत शांतीलाल आण्णा देवकर (रा.बाभुळगाव देवकर वस्ती,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

शांतीलाल देवकर हे १ मेला दुपारी ३:४५ च्या सुमारास बाभुळगावचे हद्दीतील शेतजमीन गट.नं.३१५ मध्ये जमनीची लेवल करत होते. जमिनीशेजारी असलेल्या भिमा नदीपात्रात पाण्यात एक पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीराची त्वचा कुजलेली पांढरी व थोडी काळपट पडलेली होती. त्याच्या अंगावर पांढरे रंगाचे धोतर असून उंची अंदाजे ५ ते ५.५ इतकी आहे. सदर प्रेताबाबत कोणाला माहिती असल्यास इंदापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.