चाळीस लाख रुपयांचा विमा सोडून बाप गेला . ! मग त्याने पंढरपूर रस्त्यावरील बेवारसालाच बाप केला .. ! सत्य समजताच पोलीसही चक्रावले ..!!

चाळीस लाख रुपयांचा विमा सोडून बाप गेला . ! मग त्याने पंढरपूर रस्त्यावरील बेवारसालाच बाप केला .. ! सत्य समजताच पोलीसही चक्रावले ..!!

कोरोना च्या काळात स्वतःच्या बापावर अंत्यसंस्कार करायला देखील मुलं पुढे आली नाहीत, हे चित्र अजूनही अनेकांना स्मरत असेल… पण सातारा पोलिसांनी असा मुलगा पाहिला; ज्याने स्वतःचा बाप नसतानाही त्या मृत देहाला कवटाळून बाबा म्हणून हाक मारली..!

 एवढेच नाही अंत्यसंस्कार देखील केले. फक्त घरच्यांना त्याने का बोलावले नाही? म्हणून पोलिसांना शंका आली आणि 40 लाख रुपयांचा विमा माणसाला कोणत्या स्तरावर घेऊन जातो याची प्रचिती मोडनिंब ता. माढा, विडणी ता. फलटण आणि सातारा जिल्ह्यातील अनेकांना आली

एका आश्‍चर्यकारक व पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपास यामुळे विमा कंपनीला 40 लाखांचा गंडा घालू पाहणारा मोडनिंब तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील भामटा पोलिसांच्या ताब्यात आला.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील विडणी गावच्या हद्दीत पंढरपूर रस्त्यावर एक बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवून त्याची माहिती सोशल मीडियावर फिरवली. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दादा हा फलटण पोलिसांकडे पोहोचला. सोबत जाताना त्याने आधार कार्ड पॅन कार्ड स्व साक्षांकित करून नेले होते.
पोलिसांनी देखील त्याला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मृतदेह पहाताच त्याने हंबरडा फोडला. बाबा अशी हाक मारून मृतदेह त्याने कवटाळला. पोलिसांनाही भरून आले. तातडीने त्यांनी सर्व शासकीय सोपस्कार पार पाडून मृतदेह दादा याच्या ताब्यात दिला. मात्र त्याने विडणी गावातच या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

दुसऱ्या दिवशी गावातील काही जणांनी पोलिसांना माहिती दिल्याने फलटणचे फौजदार सागर आरगडे यांनी दादा याचे गाव गाठले. मोडनिंब मध्ये गेल्यानंतर दादा याच्या कुटुंबीयांनी वडील विलास यांचे दीड वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे सांगितले. मग पोलिसांनी दादा याला ताब्यात घेतल्यानंतर मोठा भांडाफोड झाला.
दादा याच्या वडिलाच्या नावाने एका बँकेमध्ये 40 लाख रुपयांचा विमा होता. मात्र वडिलांचे निधन कोरोनाच्या काळात झाल्याने त्याला ते पैसे घेता आले नाहीत. परिणामी हे पैसे घेण्यासाठी तो एका बेवारस मृतदेहाच्या शोधात होता. फलटण मधून संधी त्याला चालून आली, पण काळ काही त्याच्या सोबतीला नव्हता.