आपल्या जवानाचं लग्न , सैन्याने नवरदेवाला गावी पाठवले थेट हेलिकॉप्टरने !

आपल्या जवानाचं लग्न , सैन्याने नवरदेवाला गावी पाठवले थेट हेलिकॉप्टरने !

श्रीनगर, 28 एप्रिल : सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुरुवारी एका जवानाला त्याच्या लग्नासाठी (wedding ceremony) वेळेवर जाता यावं, यासाठी त्याला एअरलिफ्ट करण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर (helicopter) पाठवलं

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) रिमोट पोस्टवर तैनात असलेल्या या जवानाला ओडिशात 2,500 किमी दूर त्याच्या गावी जायचं होतं. सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये अत्यंत उंचावरच्या चौकीवर तैनात असलेले 30 वर्षीय कॉन्स्टेबल नारायण बेहेरा याचं 2 मे रोजी लग्न होणार आहे. ते म्हणाले की, सध्या एलओसी पोस्ट बर्फानं झाकलेलं आहे आणि काश्मीर खोऱ्याशी त्याचा रस्ता मार्गाने संपर्क सध्या बंद आहे. या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांसाठी लष्करी हवाई उड्डाण हे एकमेव उपलब्ध वाहतुकीचं साधन आहे.अधिकाऱ्याने सांगितलं की, जवानाच्या पालकांनी नुकतेच युनिट कमांडरशी संपर्क साधला. त्यांची लग्नाच्या तारखेची सर्व तयारी पूर्ण झाल्यामुळे ते चिंतेत होते. आपला मुलगा आपल्या लग्नासाठी वेळेवर पोहोचू शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं. हे मध्यरात्रीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त ही बाब बीएसएफचे महानिरीक्षक (काश्मीर फ्रंटियर) राजा बाबू सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली.

श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या चित्ता नावाच्या दलाच्या हेलिकॉप्टरने बेहराला तत्काळ एअरलिफ्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. गुरुवारी पहाटे हेलिकॉप्टरने बेहरा यांना श्रीनगरला आणलं. ते आता ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील आदिपूर गावात आपल्या घरी जाणार आहेत. सिंग म्हणाले की, त्यांनी हवाई सेवेला मान्यता दिली.

कारण, सैनिकांचं कल्याण हे त्यांचं "प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं प्राधान्य" आहे. हे विवाहित असूनही दुसऱ्यांदा केलं लग्न; समजताच दुसऱ्या पत्नीने उचललं 'हे' पाऊल CAPF जवानांसाठी विमान प्रवास मंजूर केंद्रीय गृह मंत्रालयाने CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) कर्मचाऱ्यांना अनेक मार्गांवर विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. इंडिगो ही विमानसेवा केंद्रीय सुरक्षा दलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेईल. विशेष बाब म्हणजे CAPF कडून मिळणारी हवाई सेवा 31 जुलै 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या सेवेसाठी बीएसएफला नोडल एजन्सी बनवण्यात आले आहे. मात्र, याआधीही हवाई सेवेसाठी नोडल एजन्सीची जबाबदारी बीएसएफकडे आहे.