टॉयलेट सीटमध्ये पडला मोबाईल ; बाहेर काढण्यासाठी महिलेनं डोकं आत घातलं पण झाला भलताच उद्योग

टॉयलेट सीटमध्ये पडला मोबाईल ; बाहेर काढण्यासाठी महिलेनं डोकं आत घातलं पण झाला भलताच उद्योग

नवी दिल्ली 24 एप्रिल : आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे वॉशरूममध्ये आपला मोबाईल वापरतात. मोबाईलचा वापर करत लोक वॉशरूममध्ये आपला वेळ घालवतात. या दरम्यान अनेकवेळा काहीतरी अपघात होतात.

अनेकदा मोबाईल वॉशरूममध्ये पडतो. टॉयलेट सीटमध्ये पडलेला महागडा फोन पाहून सहाजिकच कोणालाही दुःख होईल. असाच एक अपघात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये एका महिलेसोबत घडला आहे. तिचा फोन अचानक टॉयलेट सीटमध्ये पडला (Phone Falls in Toilet Seat).

महिलेनं मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिचं डोकंच यात अडकलं (Woman's Head Stuck in Toilet Seat). नंतर अग्निशमन दलाला बोलावून तिचं डोकं बाहेर काढावं लागलं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम क्रॅश केलं स्वतःचं विमान; मात्र उडी घेताना घडलं असं काही की.., धक्कादायक असोसिएटेड प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या महिलेचं नाव समोर आलेलं नाही. मात्र, तिचं वय चाळीशीच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं.



ही महिला ऑलिम्पिक नॅशनल फॉरेस्टच्या माउंट वॉकरमध्ये असताना तिचा फोन टॉयलेटमध्ये पडला. महिलेनं आधी स्वत:चा फोन काढण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या कुत्र्याच्या पट्ट्याच्या सहाय्याने सीटच्या आत पडलेला फोन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

यानंतर सीटच्या आतमध्ये डोकं घालून आणि हात खोलवर नेऊन तिने मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचं डोकं