हातात बंदूक , खांद्यावर खाट ; गर्भवती महिलेला जवानानं पोहोचवलं रुग्णालयात , लोक म्हणाले , हा तर Real Hero

नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी मानवतेचं दर्शन घडवून दिलं आहे. दंतेवाडा (Dantewada) येथे शोध मोहिमेदरम्यान, प्रसूती वेदना होत असलेल्या एका गर्भवती महिलेला डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या (DRG) जवानाने खाटेवर उचलून रुग्णालयात नेले.
या ठिकाणी तैनात असलेले जवान कायमच लोकांची मदत करत असतात. आता असंच एक प्रकरण दंतेवाडातील गाव रेवाली येथून समोर आलं आहे. या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या जवानानं गर्भवती महिलेलं खाटेवरून रुग्णालयात पोहोचवलं. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण केले होते. यादरम्यान महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. परंतु रस्त्यांमध्ये अडथळे असल्याकारणानं रुग्णवाहिकेला पोहोचणं शक्य नसल्याचं तिच्या पतीला सांगण्यात आलं.
यानंतर जवानांनी खाटेलाच स्ट्रेचरचं रुप दिलं आणि जवळपास ३ किलोमीटर लांबपर्यंत पोहोचवलं. या ठिकाणी डीआरजीचं वाहन थांबवण्यात आलं होतं. त्यातून महिलेला ९० किमी लांब पलनार येथे रुग्णालयात नेण्यात आलं. आता बाळ आणि महिला दोघांचीही प्रकृ
ती उत्तम आहे. दरम्यान नेटकऱ्यांनही जवनाचं कौतुक करत याला रिअल हिरो असं म्हटलं आहे.