Video Viral : पक्ष्याच्या प्रेमापुढे बुल्डोजरही पडला फिका , आनंद महिंद्रांनी शेअर केला जबरदस्त व्हिडीओ

Video Viral : पक्ष्याच्या प्रेमापुढे बुल्डोजरही पडला फिका , आनंद महिंद्रांनी शेअर केला जबरदस्त व्हिडीओ

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर होत असतात. आईला तिच्या मुलांपेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. एखाद्या साहित्य आणि समाजासमोर सुद्धा आईच्या प्रेमाचे उदाहरणही फार कमी पडते.

उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतात. यावेळी सुद्धा महिंद्रांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आईच्या प्रेमाचाच विजय होताना दिसत आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत मां तुझे सलाम असं लिहिलं आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये ?

या व्हिडिओमध्ये एका जमिनीवर बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. बुल्डोजर माती असलेल्या ठिकाणी येतो. मात्र, त्या ठिकाणी टिटवी म्हणणाऱ्या पक्षाची अंडी असताना दिसत आहेत. जेव्हा बुल्डोजर त्या ठिकाणी येतो. त्यावेळी तो पक्षी त्या अंड्यांवर बसून राहतो. तसेच आपल्या पिल्लांचे संरक्षण करताना दिसतो. तसेच इतकं मोठं संकट सामोरे येऊन सुद्धा तो पक्षी या संकटाला समोरे जातो. जसा बुल्डोजर त्या अंड्यांच्या जवळ येतो. तसा पक्षी आपला प्रखर आवाज करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये पक्षाला मोठं यश मिळालं आणि बुल्डोजरही त्या पक्षापुढे फिका पडला.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, मां तुझे सलाम. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे अद्यापही समजलेलं नाहीये. मात्र, नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. आईपेक्षा जास्त प्रेम आणि आपुलकी कोणीही देऊ शकत नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर अशी हिंमत फक्त आईच दाखवू शकते, असं दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे.