हरभजनसिंह -गीता बसरा च्या संसारात गोड बातमी... चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

हरभजनसिंह -गीता बसरा च्या संसारात गोड बातमी... चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Pandharpur Live Online: भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसराच्या घरी पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंहनं ट्वीट करुन मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. मुलगा झाल्याची बातमी कळताच हरभजन आणि गीता बसरावर शुभेच्छांचा वर्षाव केला जाऊ लागला आहे.

आहे.

गीता बसराने मार्च महिन्यातच आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती. तिने त्यावेळी जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगी दिसले होते. हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव हिनाया आहे.

गीता बसरा ब्रिटेनमध्ये जन्मली. तिनं 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'द ट्रेन' मध्येही ती दिसली. मात्र तिला बॉलिवूडमध्ये जास्त यश मिळू शकलं नाही. हरभजन आणि गीता आपल्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं.

गेल्या आठवड्यात वाढदिवसादिवशी हरभजनच्या चित्रपटाची घोषणा
क्रिकेटपटू हरभजन सिंग क्रिकेटचं मैदाना गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हरभजन 'फ्रेंडशिप' या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. हरभजनच्या 41 वाढदिवसानिमित्त शनिवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केले होते. हरभजन सिंगने यापूर्वी 'मुझसे शादी करोगी', 'भज्जी इन प्रॉब्लम' आणि 'सेकंड हँड हसबंड' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र आता भज्जी मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. टफेंड स्टुडिओ लिमिटेडने हरभजनसोबतच्या आपल्या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी केली होती.