पंढरपूर सिंहगड मध्ये "गूगल क्लाऊड सर्टिफिकेशन" या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात "गूगल क्लाऊड सर्टिफिकेशन" या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही ऑनलाइन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात शनिवार, दि.१५ मे २०२१ रोजी "गूगल क्लाऊड सर्टिफिकेशन" या विषयावर पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधील प्रा. प्रमोद देशमुख यांची ऑनलाईन कार्यशाळा झाली.

पंढरपूर सिंहगड मध्ये "गूगल क्लाऊड सर्टिफिकेशन" या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न
सद्या सर्वञ कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन आजच्या कोरोना च्या काळातही सिंहगड संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन व्याख्याने तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. या कार्यशाळेद्वारे प्रा. प्रमोद देशमुख यांनी "गूगल क्लाऊड सर्टिफिकेशन" मधील क्लाऊड कॉम्पुटिंग बेसिक कन्सेप्टस, क्लाऊड कॉम्पुटिंग आर्किटेक्चर, डिप्लोयमेंट मॉडेल्सचे प्रकार, सर्विस मॉडेल्स इत्यादीचे ऑनलाइन मार्गदर्शन केले तसेच "क्विक लॅब" च्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून ऑनलाइन बेसिक सर्टिफिकेशन करून घेतले.

या कार्यशाळेत काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी या कार्यशाळेतील मिळालेले ज्ञान अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी किरण संतानी यांनी केले तर  सहभागी मान्यवरांचे आभार प्रा. सुमित इंगोले यांनी मानले.

  हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.