आज *श्री. दर्लिंग देवस्थान मगरवाडी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचे आयोजन : पै.योगेश बोंबाळे*

आज *श्री. दर्लिंग देवस्थान मगरवाडी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचे आयोजन : पै.योगेश बोंबाळे*

*आज *श्री. दर्लिंग देवस्थान मगरवाडी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचे आयोजन : पै.योगेश बोंबाळे*
  *मगरवाडी-प्रतिनिधी - दिनेश नकाते

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे श्री. दर्लिंग देवस्थान यात्रे निमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात इतिहासीक निकाली कुस्त्याचे भव्य दिव्य असे आयोजन केले असून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील इतिहासीक मैदान असून पंढरपूर तालुक्यात प्रथमच ५० रु पासून २ लाख ५० हजार रूपये पर्यंतच्या  निकाली कुस्त्याचे आयोजन बुधवारी  दि. १८ मे  रोजी दु. ३ वाजता,होणार आहे.

  या कुस्तीसाठी माजी आमदार व पांडुरंग सह साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा.लि.म्हैसगाव
यशवंत शिंदे, विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, युवा नेते विश्वराज महाडिक,सभापती अर्थ व बांधकाम सोलापूर विजयराज डोंगरे, जि.प. सदस्य सुभाषराव माने, सभापती कृ.उ.बा.स.पंढरपूर दिलीप घाडगे,संस्थापक सचिव स्वेरी इंजिनीअरींग कॉलेज पंढरपूर प्रा.डॉ बी.पी. रोगे, उद्योजक खंडाळी राजाभाऊ अंकुशराव, डी वाय एस पी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे,पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका मिलिंद पाटील, संचालक पांडुरंग सह साखर कारखाना लक्ष्मण धनवडे, गव्हमेंट कॉन्ट्रक्टर पुणे किरण चव्हाण, मा.संचालक भिमा सह साखर कारखाना चंद्रकांत पवार, प्रगतशील बागायदार
तुगत चे युवा नेते स्वप्नील रणदिवे,प्रगतशील बागायदार पेनूर मारुती गवळी, भाजपा उपाध्यक्ष-नायगाव दादर (मुंबई) प्रतिक (टिकू ) नकाते, उपअधीक्षक भुमीअभिलेख जयदीप शितोळे
मल्लसम्राट अकलुज रावसाहेब मगर,वस्ताद गंगावेश तालीम कोल्हापूर विश्वास हारुगले, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तालीम संघ सर्जेराव चवरे, कुस्ती सम्राट अस्लम काझी, सम्राट कृषी केंद्र टाकळी-सिकंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाली कुस्त्याचे जंगी मैदानाचे आयोजन केले आहे.


प्रथम क्रमांकाची कुस्ती पै.सिंकदर शेख(मोहोळ)पै. भारत मदने( बारामती) दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै.माऊली जमदाडे(चिलाईवाडी)पै. भोला(पंजाब)तिसऱ्या क्रमांकाची असे आवाहन कुस्ती पै.महारूद्र काळे (कुडूवाडी ) पै.सुदर्शन खोतकर ( पुणे ) चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै.दत्ता नरके(जुनोनी)पै.विक्रम शेटे (इचलकरंजी) पाचव्या क्रमांकाची कुस्ती पै.सुरज मगर (मगरवाडी) पै. संदिप पाटील (सांगली) सहाव्या क्रमांकाची कुस्ती पै. तेजस रेवडकर (मगरवाडी)पै. बबलू जगताप ( सरकोली) ह्या पैलवान यांच्या कुस्त्या ठरवण्यात आल्या आहेत.     दुपारी १२ ते दु. ३ वाजेपर्यंत ५० रूपये ते १०००० हजार रूपये च्या कुस्त्या नेमल्या जातील. पैलवानाच्या जिवीताची हानी स्वतःवर राहिल, नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. कुस्ती निवेदक शंकर पुजा री(कोथळी) व धनाजी मदने(पुळूजवाडी)हे करणार आहेत. मगरवाडी येथे जास्तीत जास्त पैलवानांनी ह्या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन आपले नावलौकिक करावे.असे आवाहन 
श्री.दर्लिंग देवस्थान व महान भारत केसरी व्यायाम शाळा, समस्त ग्रामस्थ मगरवाडी यांनी केले.