Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!

Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!

Bank Holidays : बँकांना मे महिन्यात एकूण 11 सुट्ट्या मिळालेल्या आहेत. हे लक्षात ठेवा कि, येत्या शनिवारपासून बँका 3 दिवस बंद राहणार आहेत.

आता जवळपास अर्धा महिना उलटून गेलेला आहे.

बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असल्याने 16 मे रोजी भारतातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहणार (Bank Holidays) आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे 14 मे आणि 15 मे रोजी बँका बंद राहतील. RBI च्या वेबसाईटवर दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांचे डिटेल्स दिले जातात.

या महिन्यातील एकूण 11 सुट्ट्यांपैकी 5 सुट्या (Bank Holidays) याआधीच देण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 मे (रविवार), 2 मे (ईद-उल-फित्र), 3 मे (भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद (ईद-उल-फित्र)/बसव जयंती/अक्षय तृतीया), 8 मे (रविवार) आणि 9 मे (रवींद्रनाथ टागोर जयंती) यांचा समावेश आहे. आता आणखी 6 सुट्ट्या बाकी आहेत. 14 ते 16 मे या सलग तीन सुट्ट्यांनंतर 22 मे हा रविवार आहे. त्यानंतर 28 आणि 29 रोजी अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असेल.