सांगलीत कर्नाटकच्या स्विफ्ट डिझायर मोटारीतून ७५ लाख रुपये जप्त , तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

सांगलीत कर्नाटकच्या स्विफ्ट डिझायर मोटारीतून ७५ लाख रुपये जप्त , तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकात नोंदणी झालेल्या मोटारीतून सांगली शहर पोलिसांनी ७५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. मोटारीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सांगली शहरातील सिटी पँलेस हाँटेलजवळ रात्रीच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. स्विफ्ट डिझायर मोटारीतून ७५ लाख रुपये जप्त केल्याप्रकरणी आटपाडी येथील आकाश नारायण केंगार, सुनील शहाजी कदम आणि महेंद्र लक्ष्मण जावीर या तिघांना ताब्यात घेतले आहे.

सांगली शहरात एका खासगी मोटारीतून मोठी रोकड येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा लावला होता. यावेळी स्विफ्ट डिझायर (केए ५५ एम ८०३७) ही मोटार संशयास्पद आढळली. या मोटारीची झडती घेतली असता निळ्या रंगाच्या बॅगेत नोटांची बंडले आढळली. ही रक्कम कोठून आणली, कोणाच्या मालकीची आहे, याबाबत मोटारीत असलेल्या तिघांना समाधानकारक खुलासा करता आला नाही.

यानंतर पोलिसांनी रोकडसह मोटार जप्त केली. तसेच आरोपी असलेल्या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत प्राप्तीकर विभागाला कळविण्यात येणार असून त्यांच्या ताब्यात ही रोकड दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.