विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करणे हाच स्वेरीचा वसा

विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करणे हाच स्वेरीचा वसा


विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करणे हाच स्वेरीचा वसा
                                                           

 -डीन ॲकॅडमीक्स प्रा.डॉ.प्रकाश तेवारी
केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांची स्वेरीला सदिच्छा भेट


पंढरपूर – ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्वेरी अनेक उपयुक्त उपक्रम राबवते ही बाब अत्यंत मोलाची असून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या स्वेरी सारख्या शैक्षणिक संस्थेला नॅक चे 'ए प्लस' मानांकन मिळते ही गोष्ट देखील अभिमानास्पद आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या विविध भागांची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि त्यांच्या उज्वल करिअर साठी केले जात असलेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात स्वेरीने सुरुवातीपासूनच सातत्य राखले आहे, हे विशेष!’ असे प्रतिपादन हुबळी (कर्नाटक) मधील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन अर्थात केएलई सोसायटीच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तील डीन ॲकॅडमीक्स प्रा. डॉ. प्रकाश जी. तेवारी यांनी केले. 


       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला हुबळी (कर्नाटक) मधील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन अर्थात केएलई सोसायटीच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापक, संशोधक व तज्ञांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे प्रमुख डीन ॲकॅडमीक्स प्रा. डॉ. प्रकाश तेवारी स्वेरीतील शैक्षणिक सुविधा पाहून गौरवोद्गार काढत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या कामगिरीचा लेखा-जोखा सादर केला तसेच त्यांनी 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन' अर्थात 'ट्रिपल पी इ' ची निर्मिती कशी झाली याबाबत विवेचन केले. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक दर्जा उंचावण्यासाठीचे स्वेरीतील विविध शैक्षणिक उपक्रम, त्यांची कार्यपद्धती, स्वेरीला मिळालेली मानांकने, संशोधनातील गरुड भरारी, विद्यार्थ्यांना करिअरसाठी असलेल्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन वर्ग व यामुळे मिळालेले यश, प्रशासकीय क्षेत्रात स्वेरीचे पडलेले दमदार पाऊल या व अशा महत्वाच्या बाबींची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्वेरी कॅम्पस मधील विविध विभागाबरोबरच विविध प्रयोगशाळांना भेट दिली व तेथे सुरु असलेल्या संशोधनाचा आढावा घेतला तसेच वर्कशॉप, प्लेसमेंट विभाग यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. पुढे बोलताना प्रा.डॉ. तेवारी म्हणाले की, ‘स्वेरीतील आदरयुक्त संस्कृती व विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आदरयुक्त संबंध या बाबी खरंच उल्लेखनीय आहेत. यामुळे विद्यार्थी संस्कारित होतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात मिळतो. स्वेरी अभियांत्रिकी कडून शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे प्रयत्न नक्कीच स्तुत्य व अनुकरणीय आहेत.’ यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त व आर सेन्स टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा. लि.चे डायरेक्टर प्रा. सूरज रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नॅक’ आणि ‘एनबीए’ च्या दृष्टिकोनातून विकसित केलेल्या 'आर वर्क' या ऑनलाईन इआरपी प्रणालीचे सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. पुढे त्यांनी स्वेरीच्या सोलार रूफ टॉप प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली व स्वेरीच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांच्या सोबत प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ.बी.बी.कोट्टुरशेट्टर, सेंटर फॉर इंजिनिअरिंग रिसर्चच्या संचालक प्रा. डॉ. विजयालक्ष्मी एम., मॅथेमेटीक्स विभागाच्या प्रा. डॉ. सुमेधा शिंदे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रा.चैतन्य अक्कनवर,इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रा.मिनल एस. साळुंखे, इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रा.तनुजा जवळी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा. गुरुपादय्या एम. हिरेमठ, स्वेरीतील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.