ड्युटी करताना ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर बेशुद्ध , वाचवायला पुढे आली महिला आणि ... पाहा

ड्युटी करताना ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर बेशुद्ध , वाचवायला पुढे आली महिला आणि ... पाहा

मुंबई : देशभरात उष्णता कमालीची वाढत आहे. उष्माघाताचा त्रास होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत उष्माघाताचे 25 बळी गेले आहेत. वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे.

मात्र पोलीस आणि वाहतूक पोलीस या कडाक्याच्या उन्हातही आपली ड्युटी करताना दिसतात.

न चुकता आपली ड्युटी करणाऱ्या पोलिसांची मदत फार कमी लोक करत असतात. रणरणत्या उन्हात ड्युटी करणाऱ्या एक ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उन्हाचा त्रास झाल्याने ट्रॅफिक पोलीस बेशुद्ध पडतो. आजूबाजूने काही गाड्या जातात मात्र त्याची मदत करायला काही मिनिटं कोणीच येत नाही. एक महिला आपल्या मुलीसोबत स्कुटीवरून जात असताना तिचं लक्ष या बेशुद्ध असलेल्या ट्रॅफिक पोलिसाकडे जातं.

ती या ट्रॅफिक पोलिसाची मदत करते. त्याला शुद्धीवर आणण्यात तिला यश येतं. सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या महिलेचं कौतुक सगळीकडे केलं जात आहे.

हा व्हिडीओ @IAmJitendraa नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला. 5 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला. अनेकांनी या महिलेला कडक सॅल्युटही केला.