पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे टिपर-मोटारसायकची धडक; भाळवणीतील तरूणाचा मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे टिपर-मोटारसायकची धडक; भाळवणीतील तरूणाचा मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे घडलेल्या अपघातात एका भाळवणी ता. पंढरपूर येथील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

समजलेल्या माहितीनुसार प्रशांत हनुमंत पवार ( मूळ गाव भाळवणी सध्या  इसबावी, पंढरपूर) हा 29 वर्षीय तरूण पंढरपूर कडून भाळवणी कडे मोटार सायकल वर जात असताना गादेगाव कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या टिपरची धडक होऊन प्रशांत पवार हा युवक गंभीर जखमी झाला होता.


त्याला पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल ला घेऊन गेले असता तिथेच त्याचे दुःखद निधन झाल्याचे समजते.

प्रशांतच्या अपघाती निधनाने भाळवणी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.