मंदिराच्या उत्सवादरम्यान दुर्घटना ; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू

मंदिराच्या उत्सवादरम्यान दुर्घटना ; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू

तंजावर- तामिळनाडूच्या तंजावर येथे एका मंदिराच्या रथ उत्सवादरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेत विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.

रथयात्रेदरम्यान रथ आणि विजेच्या तारांचा संपर्क झाल्याने विद्युत प्रवाह रथात उतरला व ही भीषण दुर्घटना घडली.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.