जनतेवर इंधन दरवाढीचा बोजा टाकून मोदी सरकारची छप्परफाड कमाई! पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दराचा सामान्यांना फटका!!

Pandharpur Live Online: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत असल्याने कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या जोरात आहे. कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नसून मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत.

जनतेवर इंधन दरवाढीचा बोजा टाकून मोदी सरकारची छप्परफाड कमाई! पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दराचा सामान्यांना फटका!!

इंधन दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा पार झाल्यावर डिझेलसुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत असताना मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच मोदी सरकारच्या कृपेने कंपन्या आणि एकूणच केंद्र सरकारची चांदी झाली आहे.

याआधी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून सरकारला ४.२३ लाख कोटी रुपये मिळाले होते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्राप्तिकराच्या रुपात सरकारच्या तिजोरीत ४.६९ लाख कोटी रुपये जमा झाले. तर कंपन्यांनी जमा केलेल्या कॉर्पोरेट करांच्या माध्यमातून ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून सरकारला ४.२३ लाख रुपये मिळाले होते. आता यात तब्बल १ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारला इंधनावरील करांमधून सरकारला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

म्हणजेच एकूण करामध्ये आता इंधन कराने मोदी सरकारला अच्छे दिन आणले आहेत. देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत.

..................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही. आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताच विचार सरकारने केलेला नाही. उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम उद्योगधंद्यांवर झाला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो लोकांना पगार कपात सहन करावी लागली. लॉकडाऊनमुळे अनेकांचं उत्पन्न घटलं. मात्र सरकारनं याच कालावधीत पेट्रोल, डिझेलवरील करांमुळे छप्परफाड कमाई केली. लोकांना दिलासा देण्यासाठी करांमध्ये कपात करण्याची मागणी होत असताना सरकारनं कर कायम ठेवले. त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसला.

त्यामुळे पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल, डिझेलवरील करांतून मिळालं आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारनं पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल ५.२५ लाख कोटी रुपयांची कमाई केली. याच कालावधीत प्राप्तिकराच्या माध्यमातून सरकारला ४.६९ लाख कोटी रुपये मिळाले. कंपन्यांनी भरलेल्या कॉर्पोरेट करांतून सरकारला ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

पेट्रोल, डिझेलवर सरकारकडून प्रचंड कर आकारला जातो. यात उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर यांच्यासह आणखी अर्धा डझन लहान करांचा, शुल्कांचा आणि सेसचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारला ५.२५ लाख कोटी रुपये मिळाले. यामध्ये केंद्र सरकारकडून घेतला जाणारा अबकारी कर आणि राज्यांचं मूल्यवर्धित कर यांचा समावेश आहे. मूल्यवर्धित करांचा आकडा केवळ डिसेंबरपर्यंतचा आहे. मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून मार्च तिमाहीत राज्यांना मिळालेल्या उत्पन्नाचा यात समावेश नाही.