काल चंद्रभागेत बुडालेल्या 'त्या' तरूणाचा मृतदेह सापडला

पंढरपूर लाईव्ह: काल चंद्रभागेत पोहत असताना नदी पात्रात बुडलेल्या 'त्या' तरूणाचा मृतदेह आज सापडला आहे.

काल चंद्रभागेत बुडालेल्या 'त्या' तरूणाचा मृतदेह सापडला

काल चंद्रभागेच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आज दुपारी 1 च्या सुमारास नदीच्या पैल तिरावरील श्री म्हसोबा मंदिराच्या घाटाजवळ आढळून आला.

काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपकी दोघेजण नदीपात्रात बुडाले होते. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले होते तर दुसर्‍याचा शोध सुरू होता. त्या तरूणाचा मृतदेह आज सापडला आहे.

भक्त पुंडलीक मंदिराच्या ट्रस्टचे संतोष नेहतराव, भागवत करकमकर, ओंकार संगीतराव या होडी चालकांनी ही शोध मोहीम राबविली होती. सदर मृतदेह होडी चालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

...............

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................