आक्षेपार्ह अवस्थेत पकडले गेले विवाहित प्रेमी युगुल, ढोल -ताशांच्या गजरात काढली धिंड

आक्षेपार्ह अवस्थेत पकडले गेले विवाहित प्रेमी युगुल, ढोल -ताशांच्या गजरात काढली धिंड

Pandharpur Live Online :

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका विवाहित प्रेमी युगुलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी या जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर सर्वांनी मिळून दोघांनाही एवढी मारहाण केली की, प्रेयसीचा डोळा सुजला आणि तिचे कपडेही फाटले. हे प्रकरण शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

हे प्रकरण विवाहबाह्य संबंधाचे आहे. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोघेही विवाहित आहेत. प्रेयसीला दोन आणि प्रियकराला तीन मुले आहेत. ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रेयसीचा नवरा घराबाहेर पडताच काही वेळाने प्रियकर शांतपणे तिच्या घरात घुसला. हे चक्र बरेच दिवस अखंड सुरु होते. मात्र संधी मिळताच गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून दोघांनाही बेदम मारहाण केली.

दोघांनाही ढोल-ताशांच्या गजरात गावात फिरवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेमी युगुलाची सुटका केली आणि दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्याचवेळी ग्रामस्थ आता पंचायत आणि त्यांच्या स्तरावर हे प्रकरण सोडविण्याचे प्रयत्न करत आहेत. तक्रार आल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर डीआयजी म्हणतात की, त्यांना या घटनेची माहिती नाही.